देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला मोठा खुलासा..

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीबाबत आणि लसीकरणावर ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी ब्लॅक फंगस या आजाराबाबत चिंता व्यक केली. 

    नवी दिल्ली –  देशात धुमाकूळ घालणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता काहीशी ओसरली आहे. (Coronavirus in India) मात्र आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही. मात्र येणाऱ्या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मुलांचा विचार करू इंफ्रास्ट्रक्चर तयार करणे गरजेचे आहे.