जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे अभिनंदन, ७५ कोटींपेक्षा जास्त भारतीयांचे लसीकरण केल्याबद्दल खास कौतुक

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरु आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देशाने ७५ कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे.”

    देशात आतापर्यंत कोरोना लसीचे(Corona Vaccination In India) ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया(Health Minister Mansukh Mandaviya) यांनी दिली. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, “यावर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम(Vaccination Drive In India) सुरू झाल्यापासून भारतात ७५ कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर याच वेगाने लसीकरण सुरु राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील ४३ टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होईल. कोरोना साथीची तिसरी लाट रोखण्यासाठी भारताला वर्षाच्या अखेरीस ६० टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस द्यायचे आहेत.”

    मनसुख मांडविया पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरु आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देशाने ७५ कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे.”

    जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले आहे आहे. कोरोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे त्यांनी कौतुक केले. डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, “डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने कोरोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. पहिले १०० दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला ८५ दिवस लागले. दरम्यान, भारताने केवळ १३ दिवसांत ६५० दशलक्ष करोना डोसपासून ७५० दशलक्ष करोना डोस देण्याचा टप्पा पुर्ण केला आहे.”