आयएएस अधिकाऱ्याला भाजी विकताना पाहून चाहतेही पडले साधेपणाच्या प्रेमात; जाणून घ्या नेमकं प्रकरण

एखादा आयएएस अशाप्रकारे भाजी का विकतो आहे? तथापि, त्यांच्या भाजी विकण्याचं कारण समोर आलं तेव्हा लोकं हसू लागले आणि त्यांच्या हा साधेपणा लोकांना एवढा भावला की, याच साधेपणाचे ते फॅन झाले आहेत.

  जेव्हा IAS अधिकाऱ्याचे फोटो झाले व्हायरल…


  कधी कोणा IAS अधिकाऱ्याला भादी विकताना पाहिलं आहे? वास्तविक सोशल मीडियावर एका आयएएस अधिकाऱ्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात ते जीन्स-शर्ट आणि हातात स्मार्टवॉच घालून फुटपाथवर भाजी विकत असेलेले दिसत आहेत. हे फोटो पाहून आपल्याही मनात हाच प्रश्न रुंजी घालत असेल की, एखादा आयएएस अशाप्रकारे भाजी का विकतो आहे? तथापि, त्यांच्या भाजी विकण्याचं कारण समोर आलं तेव्हा लोकं हसू लागले आणि त्यांच्या हा साधेपणा लोकांना एवढा भावला की, याच साधेपणाचे ते फॅन झाले आहेत.

  त्यानंतर डिलीट केली फेसबुक पोस्ट


  डॉ अखिलेश मिश्रा उत्तर प्रदेश परिवहन विभागात विशेष सचिव आणि वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. जेव्हा त्यांची भाजी विकतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा त्यांनी त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट केली. मात्र, तोपर्यंत त्यांच्या पोस्टचे स्क्रिनशॉट इंटरनेटवर व्हायरल झाले होते. यानंतर अधिकाऱ्याने सर्वांना सांगितले की, ते भाजी का विकत आहेत.

  म्हणून विकत होते भाजी

  मी सरकारी कामासाठी प्रयागराजला गेलो होतो. तेथून लखनऊला परत येताना ते भाजी विकत घेत होते. एक वृद्ध महिला भाजी विकत होती. यादरम्यान या महिलेचं मूल तिच्यापासून काही दूर अंतरावर गेलं होतं. त्या महिलेला ते कोण आहेत हेही ठाऊक नव्हतं. अशातच त्यांनी मला विचारलं की, ५ मिनिटं माझं दुकान पाहाल का? मी लगेचच याला होकार दिला अशी त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

  तेव्हा मित्रानेच काढले होते फोटो

  महिला दुकानातून गेल्यानंतर काही लोकं भाजी खरेदीसाठी आले तर त्यांनी गंमत म्हणून भाजीचं वजन करायला सुरूवात केली. याच दरम्यान एका मित्राने फोटो काढले आणि मजा म्हणून त्याने ते फेसबुकवरही पोस्ट केले, याचे लोकांनी वेगवेगळे अर्थही काढले. आज उशिरा ही पोस्ट मी पाहिली आणि स्वत:च डिलिटही केली असं ते पुढे म्हणाले.