देशात कोरोनाची दुसरी लाट का आली? काय आहे नेमका हा ‘डेल्टा व्हेरियंट’?

या कारणांचा या पाहणीतून शोध घेण्यात आला. अल्फा विषाणू पेक्षा डेल्टा विषाणूंची संसर्ग क्षमता ५० टक्के अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याला डेल्टा विषाणू कारणीभूत आहे का? याबाबत कोणतेही ठोस पुरावे शास्त्रज्ञांच्या हाती अद्याप लागले नाहीत.

  नवी दिल्ली : देशात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही जास्त घातक ठरली. कोरोनाची दुसरी लाट निर्माण होऊन संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला असे केंद्र सरकारने केलेल्या एका पाहणीतून आढळून आले आहे. या डेल्टा विषाणूला बी.१.६१७.२ या नावानेही ओळखले जाते. ब्रिटनमधील केंट येथे सापडलेल्या अल्फा हा कोरोना विषाणू पेक्षा अधिक घातक आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला.

  देशात कोरोनाची दुसरी लाट का आली?

  या कारणांचा या पाहणीतून शोध घेण्यात आला. अल्फा विषाणू पेक्षा डेल्टा विषाणूंची संसर्ग क्षमता ५० टक्के अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याला डेल्टा विषाणू कारणीभूत आहे का? याबाबत कोणतेही ठोस पुरावे शास्त्रज्ञांच्या हाती अद्याप लागले नाहीत.

  महाराष्ट्रासह पाच राज्यांत सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आल्याचे दिसून आले. डेल्टा विषाणू सर्वच राज्यांत आढळला असला तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश, गुजरात, ओडिशा, तेलंगण या राज्यात आढळून आला आहे. भारतातील २९००० हजार कोरोना विषाणू नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यातील ८९०० नमुन्यांमध्ये डेल्टा विषाणू आढळून आला.

  भारतात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कोरोना रूग्णसंख्येत घट झाली असली तरी कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक धोकादायक आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण अधिक वेगाने होत असल्याने पहिल्या लाटेच्या तुलनेने दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला ‘डेल्टा’ हा कोरोनाचा व्हेरियंट कारणीभूत असल्याचे एका संशोधनातून समोर आलं आहे.

  ‘डेल्टा व्हेरियंट’ नेमका काय आहे?

  जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेल्या बी.१.६१७.१ हा कोरोना व्हेरियंट ‘कप्पा’ आणि बी.१.६१७.२ हा व्हेरियंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणारा आहे. हे दोन्ही व्हेरियंट सर्वप्रथम भारतात सापडले होते.

  त्यानंतर ४४ हून जास्त देशात या व्हेरियंट हे कप्पा व्हेरिएंटच्या तुलनेने ५० टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा व्हेरियंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढला. देशातील जवळपास सर्व राज्यात हा व्हेरियंट आढळला असून महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगणा मध्ये या व्हेरियंटचे प्रमाण जास्त आहे.

  जागतिक आरोग्य संघटनेने भारतात आढळून आलेल्या कोरोना डेल्टा व्हेरियंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितले आहे.

  ‘कप्पा’ आणि ‘डेल्टा’ ही दोन्ही नावं ग्रीक अल्फाबेट्सवरुन देण्यात आली आहे. या आधीसुद्धा अनेक व्हेरियंटला ग्रीक अल्फाबेट्सची नावे देण्यात आली आहे. यातील पहिला व्हेरियंट हा ब्रिटनमध्ये सापडला होता. त्याला जागतिक आरोग्य संघटनेने ‘अल्फा’ असं नाव दिले आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेल्या व्हेरियंटला ‘बीटा’ असे नाव देण्यात आलं. आणि ब्राझीलमध्ये आढळून आलेल्या व्हेरियंटला ‘गॅमा’ अस नावं देण्यात आलं होतं.

  Why did the second wave of corona hit the country What exactly is this delta variant