suicide

हरियाणामधील करनाल भागात मजूर असलेल्या एका तरुणानं आपल्या बायकोला सिमकार्ड घेऊन देण्यासाठी नकार दिल्यानंतर पत्नीनं पतीसोबतचं सात जन्माचं नातं तोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.(wife suicide after husband didnt give simcard to her)

करनाल : हरियाणामधील करनाल भागात मजूर असलेल्या एका तरुणानं आपल्या बायकोला सिमकार्ड घेऊन देण्यासाठी नकार दिल्यानंतर पत्नीनं पतीसोबतचं सात जन्माचं नातं तोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.(wife suicide after husband didnt give simcard to her) या पत्नीने चक्क आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आत्महत्या केलेली महिला आपल्या पती आणि मुलांसोबत करनालमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये राहत होती. तिचा पती मोलमजुरी करून कुटुंबियांचं पोट भरायचा. पत्नीनं सिमकार्डसाठी पतीकडे हट्ट धरला. पतीने विषय टाळला. मात्र सिमकार्ड घेऊन देण्यास नकार दिल्यावर पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करुन आपलं जीवनचं संपवलं.

मुळचा मध्यप्रदेशचा असलेला रामपाल आपल्या कुटुंबीयांसोबत दोन महिन्यांपासून राहात होता. तो मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचं पोटं भरायचा. मंगळवारी त्याच्या पत्नीनं मोबाईलसाठी नवं सिमकार्ड घेण्यासाठी हट्ट धरला. रामपालनं त्यासाठी नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. काही वेळानं पती सामान घेण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा रागाच्या भरात पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली.

महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.