ब्लॅक फंगसवरील औषधाचे उत्पादन वाढविणार; ५ कंपन्यांना परवानगी

आतापर्यंत देशभरात 2 कोटी 30 लाख लोक बरे झाले आहेत. याचबरोबर ब्लॅक फंगसवर परिणामकारक औषध एम्फोटेरिसीन-बीच्या (Amphotericin B) मुबलक पुरवठ्यासाठी पाच कंपन्यांना उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे.

    कोरोना महारमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. गेल्या 20 दिवसांपासून देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. 3 मे रोजी 17.13 टक्के रुग्ण उपचार घेत होते, आता हा आकडा 11.12 टक्क्यांवर आला आहे. रिकव्हरी रेटदेखील वाढून 87.76 टक्क्यांवर गेला आहे.

    आतापर्यंत देशभरात 2 कोटी 30 लाख लोक बरे झाले आहेत. याचबरोबर ब्लॅक फंगसवर परिणामकारक औषध एम्फोटेरिसीन-बीच्या (Amphotericin B) मुबलक पुरवठ्यासाठी पाच कंपन्यांना उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे.