विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही ? सुप्रीम कोर्टात आज निर्णय

यूजीसीच्या (UGC) ६ जुलैच्या गाईडलाईन्सनुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. त्या गाईडलाईन्सविरोधात विविध विद्यार्थ्यांच्या गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. ३० सप्टेंबरच्या आत परीक्षा घ्याव्यात अशा मार्गदर्शक सूचनाही यूजीसीनं दिल्या आहेत. परंतु त्याविरोधात महाराष्ट्र, ओडिशा आणि दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा (Final Year Exam)होणार की नाही याचा निर्णय आज (शुक्रवार) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार आहे. तसेच तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात निकाल देणार आहेत. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाची भीती विचारात घेऊन अनेक राज्यांनी या परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र, राज्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) विद्यापीठांनी परीक्षा घ्याव्यात यावर ठाम आहेत.

यूजीसीच्या ६ जुलैच्या गाईडलाईन्सनुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. त्या गाईडलाईन्सविरोधात विविध विद्यार्थ्यांच्या गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. ३० सप्टेंबरच्या आत परीक्षा घ्याव्यात अशा मार्गदर्शक सूचनाही यूजीसीनं दिल्या आहेत. परंतु त्याविरोधात महाराष्ट्र, ओडिशा आणि दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या वतीने त्याविरोधात याचिका दाखल केली होती.

या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी १८ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती. पण खंडपीठाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. शिवाय सर्व पक्षांनी आपला शेवटचा युक्तिवाद लेखी स्वरूपात कोर्टासमोर दाखल करावा, असे आदेश दिले होते. ही मुदत संपल्यानंतर बुधवारी २६ ऑगस्ट रोजी याचा निकाल येणं अपेक्षित होतं. मात्र आज शुक्रवारी या प्रकरणावर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही ? यासंदर्भात विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील संभ्रम वाढला असून भविष्याबाबत अनियमितता निर्माण झाली आहे.