‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज
‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज

भारत आणि चीनच्या लष्कर कमांडर स्तरावर चर्चेची पुढील फेरी होणार आहे. लेफ्ट. जन. पीजीके मेनन (१४व्या कॉप्र्सचे कमांडर) आणि दक्षिण क्षीनजिआंग लष्करी क्षेत्राचे कमांडर मे. जन. लिऊ लिन यांच्यात रविवारी सकाळी चुशूलजवळच्या मोल्दो येथे चर्चा होणार आहे.

नवी दिल्ली : मागील वर्षापासून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आज ( रविवार ) भारत आणि चीनच्या लष्कर कमांडर स्तरावर चर्चेची पुढील फेरी होणार आहे. लेफ्ट. जन. पीजीके मेनन (१४व्या कॉप्र्सचे कमांडर) आणि दक्षिण क्षीनजिआंग लष्करी क्षेत्राचे कमांडर मे. जन. लिऊ लिन यांच्यात रविवारी सकाळी चुशूलजवळच्या मोल्दो येथे चर्चा होणार आहे.

भारताने पाठविलेल्या स्मरणपत्राला प्रतिसाद देऊन ही चर्चा होणार आहे. या परिसरामध्ये दोन्ही देशांचे प्रत्येकी ५० हजार सैन्य बेमुदत कलावधीसाठी तैनात करण्यात आले आहे. या चर्चेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यापूर्वी मंत्रालयातील संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव हे तीन बैठकांना हजर होते. लष्करी कमांडरांची शेवटची बैठक ६ नोव्हेंबर रोजी झाली होती, तर राजनैतिक स्तरावरील चर्चा १८ डिसेंबर रोजी झाली होती.