भारतात हिवाळ्यात कोविड-१९ संसर्गाची दुसरी लाट येणार? नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही . के पॉल यांनी वर्तविली ‘ही’शक्यता

देशात कोरोनाचा प्रभाव कमी होत असून कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा गेल्या तीन आठवड्यापासून कमी आहे. तर अनेक राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल (V. K. Paul) यांनी आज सांगितले. मात्र असे असले तरीही हिवाळ्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ( Second Wave) येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी शक्यता वर्तवली. पीटीआयला (PTI) दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता अमान्य केली नाही.

हिवाळ्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते का? या प्रश्नावर पॉल म्हणाले, “हिवाळा सुरु होताच युरोप सारख्या देशांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारतातही कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविड-१९ बद्दल नव्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्यावर संशोधन सुरु आहे.” पुढे ते म्हणाले की, “माझ्यामते देशातील कोरोना संसर्गाची स्थिती आता बरी आहे. परंतु, आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण अजून ९०% लोकांना कोविड-19 चा संसर्ग होण्याची शक्यता आहे.”