केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे, ज्योतिरादित्य सिंधियांना मोठं मंत्रिपद मिळण्याची शक्यता

पंतप्रधान मोदी ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करुन घेतील, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे, मनमोहन सिंग सरकारमध्ये असतानाही सिंधिया हे त्यांच्या सक्रिय कामांमुळे चर्चेत होते. त्यामुळे त्यांनी स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण केली होती.

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात सातत्याने उच्चस्तरीय बैठक घेण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक कयास लावले जात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळता लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जेव्हा भाजपचे उपरणे गळ्यात घातले तेव्हापासूनच त्यांना भाजपकडून मोठे बक्षीस मिळणार अशी चर्चा रंगली होती गेल्या वर्षी मार्चमध्ये मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारच्या सत्ताधारी यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सिंधिया यांना मंत्रिपद देणं जवळपास निश्चित झालं आहे.

    सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या फेरबदलात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, बैजयंत पांडा यांच्या नावांची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्यांचही सूत्रांनी सांगितलं.

    सिंधिया यांचे समर्थक असलेल्या एका नेत्यानं सांगितले की, सिंधिया यांना रेल्वे मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. तसंच नगरविकास किंवा मनुष्यबळ यासारखी महत्त्वाची मंत्रालये देण्याचीही चर्चा आहे. सिंधिया यांना भाजपमध्ये येऊन १५ महिने झालेत. आता त्यांना दिलेलं आश्वासन भाजप पूर्ण करणार आहे.पंतप्रधान मोदी ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करुन घेतील, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे, मनमोहन सिंग सरकारमध्ये असतानाही सिंधिया हे त्यांच्या सक्रिय कामांमुळे चर्चेत होते. त्यामुळे त्यांनी स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण केली होती.