parliament

कोरोनाचा(corona) प्रसार टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी हिवाळी अधिवेशन(winter session of parliament) रद्द करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे.

कोरोनाचा(corona) प्रसार टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी हिवाळी अधिवेशन(winter session of parliament) रद्द करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात जोशी यांनी ही बाब मांडली आहे. पण काँग्रेसने आमच्याशी चर्चा केली नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांविषयी चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता असल्याचे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते.

सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केली पण कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सगळ्यांचे एकमत झाले असल्याचे प्रल्हाद जोशी यांनी अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, हिवाळयाचे महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. कोरोनामुळेच पावसाळी अधिवेशन सुद्धा उशिराने सप्टेंबर महिन्यात झाले होते. आता हे अधिवेशन जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.