महिलेसोबत सामूहिक बलात्काराचा Video केला Viral; पीडितेच्या पतीने मोबाइल पाहताच बसला शॉक!

महिलेवर अत्याचार करत असताना तो नराधम व्हिडीओ शूट करीत होता. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. शेवटी या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पीडितेने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी महिलेची चाचणी केली.

    पाटणा : बिहारमध्ये एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे आरोपींनी आधी महिलेसोबत (gang rape) बलात्कार केला आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला. यानंतर त्या नराधमांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला. जेव्हा हा व्हिडिओ पीडितेच्या पतीने पाहिला तेव्हा तो हादरलाच. ज्यावेळी पतीने पीडितेला याबद्दल विचारलं तेव्हा तिने नेमका प्रकार सांगितला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ एक आठवड्यापूर्वीचा आहे.

    व्हिडिओमध्ये महिलोसोबत बलात्कार केला जात आहे. महिलेवर अत्याचार करत असताना तो नराधम व्हिडीओ शूट करीत होता. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. शेवटी या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पीडितेने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी महिलेची चाचणी केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचल्यामुळे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे महिलांनी अशा प्रकरणात शांत न राहता पोलिसांकडे याबाबत रीतसर तक्रार करणं आवश्यक आहे.

    ही घटना २३ जूनची आहे. जेव्हा महिला शौचासाठी बाहेर गेली होती, तेव्हा गावातील सहा जणांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला आणि व्हिडिओ शूट केला. इतकच नाही तर घटनेनंतर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेली महिला घरी पोहोचली, मात्र तिने कोणाला काहीच सांगितलं नाही. काही दिवसात हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पीडितेच्या पतीच्या मोबाइलवरदेखील पोहोचला. यामुळे पती खूप नाराज झाला. त्याने पत्नीला याबद्दल विचारलं तेव्हा तिने नेमका प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.

    with a woman video of gang rape goes viral the victims husband was shocked to see the mobile