खराब हवामानामुळे गिर्यारोहकांची झालीये दैना; ना धड वरही जाता येईना की, खालीही येता येईना

अद्यापही कॅम्प दोनवर परिस्थितीत बदल झालेला नाही. अद्यापही स्नो फॉल व प्रचंड वारा वाहत आहे. यामुळे १० फुटांपेक्षा पुढील काहीही दिसत नाही. स्नो फॉलमुळे सॅटेलाईट फोनही काम करेनासे झाले आहेत . कॅम्प दोनवरून खालीही जाता येत नाही व वरही जाता येत नाही, अशा परिस्थितीत सर्व गिर्यारोहक धीराने व संयमाने परिस्थितीशी सामना करत आहेत.

    नवी दिल्ली : वातावरणातील बदलांमुळे माऊंट एव्हरेस्टवरील बिघडलेले वातावरण ‘जैसे थे’च आहे. मंगळवारपासून प्रचंड वारा, पाऊस आणि स्नो फॉल सुरूच आहे. मार्ग दिसत नसल्याने वरही जाता येईना आणि खालीही उतरता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कॅम्प दोनवर कस्तुरी व तिची टीम सुरक्षित आहेत. शनिवारी सकाळनंतर वातावरण सुधारेल, असा अंदाज हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.

    शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार अद्यापही कॅम्प दोनवर परिस्थितीत बदल झालेला नाही. अद्यापही स्नो फॉल व प्रचंड वारा वाहत आहे. यामुळे १० फुटांपेक्षा पुढील काहीही दिसत नाही. स्नो फॉलमुळे सॅटेलाईट फोनही काम करेनासे झाले आहेत . कॅम्प दोनवरून खालीही जाता येत नाही व वरही जाता येत नाही, अशा परिस्थितीत सर्व गिर्यारोहक धीराने व संयमाने परिस्थितीशी सामना करत आहेत.

    जखमी शेर्पाला उपचारासाठी पाठविण्यात यश

    दरम्यान, कॅम्प दोनवरील शिधा, केरोसिन संपत आले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आहे त्या शिध्यामध्ये सर्व गियारोहक एकमेकांना मदत करून वेळ मारून नेत आहेत. दोन दिवसांपूर्वी एक शेर्पा कॅम्प दोनवर गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पायाकडील भागास मोठी जखम झाल्याने त्याला तातडीने उपचाराची गरज होती. यामुळे संयोजकांनी कसेबसे करून शुक्रवारी सकाळी बेसकॅम्पला उतरविण्यात इतर शेर्पांना यश आले आहे. त्याच्यासाठी लुक्लाहून एक हेलिकॉप्टर बेसकॅम्प वरून त्याला घेऊन गेले. स्नो फॉलमुळे हेलिकॉप्टरही उडू शकत नाही.

    with kasturi Other climbers are safe at Camp Two in Everest The situation on Everest