अनैतिक संबंधातून पत्नीने दिरासोबत मिळून केली पतीची हत्या, नंतर दिरासोबत केलं भयंकर कृत्य

मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात ही घटना घडली आहे. शहरातील दामखेडा झोपडपट्टीजवळ पोलिसांना मोहन नावाच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. तपासानंतर पोलीस मोहनच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्याची वहिनी राशी घरात होती. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने काही उडवा उडवीची उत्तरं दिली.

    भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये एका महिलेचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. त्यातून त्या दोघांनी मिळून महिलेच्या पतीची हत्या केली. त्यानंतर ते दोघे एकत्र राहू लागले. मात्र आता दिरालाही कंटाळलेल्या त्या महिलेने मुलाच्या मदतीने दिराचाही काटा काढला. मात्र यावेळेचा तिचा गुन्हा मात्र लपला नाही. दिराच्या हत्येप्रकरणी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने पाच वर्षांपूर्वी पतीचीही हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.

    मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात ही घटना घडली आहे. शहरातील दामखेडा झोपडपट्टीजवळ पोलिसांना मोहन नावाच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. तपासानंतर पोलीस मोहनच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्याची वहिनी राशी घरात होती. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने काही उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यावरून पोलिसांना तिच्यावरचा संशय बळावला. त्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

    पोलीस चौकशीत सुरुवातीला राशीने तिला यातले काहीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने तोंड उघडले व तिनेच मोहनची हत्या केल्याचे कबूल केले. तसेच तिने व मोहनने मिळून पाच वर्षांपूर्वी राशीच्या पतीची देखील हत्या केली होती व त्याचा मृतदेह घरातच एका खोलीत पुरला होता. त्यानंतर पोलिसांना घरातून तिच्या पतीचा सांगाडा सापडला आहे.

    woman murdered brother in law after murder husband in madhya pradesh bhopal