Picture Credit : Twitter
Picture Credit : Twitter

महिला पार्लर मध्ये आपले केस धुत आहे. तिच्या जवळच सोबत एक महिला बसलेली आहे. कदाचित ती तिची मैत्रीण असावी. केस धुत असताना तुम्ही पाहू शकता की, महिला सारखी हालचाल करत आहे आणि तिच्या मैत्रिणीशी बोलत आहे.

    सोशल मीडिया (S0cial Media) वर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. जे पाहून आपल्याला हसू आवरणं कठीण होऊन बसतं. असं म्हणतात की, दोन महिला एकत्र आल्यानंतर त्यांना शांत बसताच येत नाही. सध्या याच्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यात महिला पार्लर (Parlor) मध्ये केस धुण्यासाठी गेली होती. केस धुत असतानाही ती सतत आपल्या मैत्रिणीशी बोलत होती. त्यानंतर या महिलेसोबत जे झालं ते पाहून तुम्हीही म्हणाल झालं ते चांगलंच झालं व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणारच नाही.

    हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. व्हिडिओ ट्विटरवर @Jamie24272184 नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, महिला पार्लर मध्ये आपले केस धुत आहे. तिच्या जवळच सोबत एक महिला बसलेली आहे. कदाचित ती तिची मैत्रीण असावी. केस धुत असताना तुम्ही पाहू शकता की, महिला सारखी हालचाल करत आहे आणि तिच्या मैत्रिणीशी बोलत आहे.

    यामुळे केस धुणाऱ्या व्यक्तीला समस्या येत आहे आणि त्या आपलं काम योग्य रितीने करता येत नाही. त्या व्यक्तीने अनेकदा त्या महिलेला स्थिर राहण्यास सांगितले कारण त्याला त्याचे काम व्यवस्थित करता येत नाही. तरीही तिने त्या व्यक्तीचं काही एक ऐकलंच नाही.

    यानंतर वैतागलेल्या त्या व्यक्तीने शॉवरने तिच्या तोंडावर पाणीच ओतलं आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडिओ पाहून युजर्सनी महिलेवर कमेंटचा भडिमार केला आहे. एका युजरने लिहिलं आहे की, याच लायकीची आहे ती.

    woman was doing while washing her hair in parlour repeatedly talking to her friend then the employee did something like this people said it is worth it