साडे ७ कोटींच्या बांगड्या, त्यातून नेली जात होती अशी गोष्ट की…पाहून अधिकारीही झाले हैराण; वाचा सविस्तर

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सीमा शुल्क अधिकाऱ्यानी साडे ७ कोटी रुपयांची हेरोइन जप्त केली, याचं वजन १८ किलोग्रॅम आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे ड्रग्ज बांगड्यांमध्ये भरण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरुवारी जप्त केलेले ड्रग्ज आफ्रिकेतून दिल्लीला एका पत्त्यावर पाठवली जात होती.

    नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi Airport) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तब्बल साडे सात कोटी रुपयांची हेरोइन जप्त केली आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणच्या एअरपोर्टवर हेरोइन किंवा ड्रग्स तस्करी केल्याचे वृत्त समोर येत असते. यात तस्कर नेहमी नवनव्या क्लृप्ता शोधत असल्याचं दिसतं. आता तर एका आरोपीने तस्करी करण्यासाठी ज्या पद्धतीचा उपयोग केला आहे, ते पाहून तुम्ही शॉक व्हाल.

    दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सीमा शुल्क अधिकाऱ्यानी साडे ७ कोटी रुपयांची हेरोइन जप्त केली, याचं वजन १८ किलोग्रॅम आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे ड्रग्ज बांगड्यांमध्ये भरण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरुवारी जप्त केलेले ड्रग्ज आफ्रिकेतून दिल्लीला एका पत्त्यावर पाठवली जात होती. गेल्या आठवड्यात दिल्ली एअरपोर्टवर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन दक्षिण आफ्रिकी नागरिकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून १२६ कोटींची हेरोइन जप्त केली होती. याचं वजन १८ किलो इतकं होतं.

    या दोन्ही प्रकरणात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे आरोपी २७ जून रोजी जोहन्सबर्गहून दोहा मार्गाने हेरोइन घेऊन येथे पोहोचले होते. आरोपींनी हेरोइन दोन बॅगेत लपवले होते. तपासादरम्यान आरोपीच्या एका बॅगेतून १० किलो तर दुसऱ्याच्या बॅगेतून ८ किलो हेरोइन जप्त करण्यात आली. सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे ग्रीन चॅनल पार करणे आणि आंतरराष्ट्रीय आगमन हॉलच्या एग्जिट गेटजवळ पोहोचल्यानंतर पकडण्यात आलं होतं.

    worth rs 7 5 crore heroin smuggled from bangles on delhi airport know the full story in details