कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी मुले मोठी होईपर्यंत ४००० रुपये प्रति महिना अर्थसहाय्य (4000/- per month financial help) उपलब्ध करून देणार आहे, ही मदत त्यांच्या पालकांकडे (care takers) सुपूर्द करण्यात येणार आहे. तर, १० वर्षांहून कमी वयाची मुले ज्यांचे कोणीही पालक नाहीत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था बाल सुधारगृहात करण्यात येईल, ज्याचा खर्च सरकारतर्फे देण्यात येईल.

  लखनऊ : कोरोना संकटकाळात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. योगी सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे संरक्षण आणि त्यांच्या देखभालीसाठी एक विशेष योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘उत्तर प्रदेश मुख्यमंत्री बाल सेवा योजना’ या नावाने ही योजना कार्यान्वित होणार आहे.

  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी मुले मोठी होईपर्यंत ४००० रुपये प्रति महिना अर्थसहाय्य (4000/- per month financial help) उपलब्ध करून देणार आहे, ही मदत त्यांच्या पालकांकडे (care takers) सुपूर्द करण्यात येणार आहे. तर, १० वर्षांहून कमी वयाची मुले ज्यांचे कोणीही पालक नाहीत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था बाल सुधारगृहात करण्यात येईल, ज्याचा खर्च सरकारतर्फे देण्यात येईल.

  तथापि, कोरोना काळात अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. अशातच योगी सरकारने शनिवारी एक योजना तयार केली, ज्या अंतर्गत आता मुलांना सरकार आर्थिक मदत करणार आहे. मुख्यमंत्री योगी यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या उत्तरप्रदेशातील मुलांची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा केली होती.

  मुख्यमंत्री योगी यांनी शनिवारी सांगितले की, कोरोना काळात ज्या मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत, त्यांची संपूर्ण जबाबदारी उत्तर प्रदेश सरकार घेणार आहे. एवढेच नाही तर कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलींच्या विवाहासाठीही सरकार १.१० लाख रुपयांपर्यंत मदत करणार आहे.

  कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या विवाहाचा खर्च, ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारे लॅपटॉप्स आणि टॅबलेट्स, देखभालीसाठी प्रति महिना ४ हजार रुपये, अनाथ मुलींच्या विवाहासाठी १.१० लाख रुपयांची आर्थिक मदत इत्यादी मोठ्या घोषणा योगी सरकारने केल्या आहेत.

  yogi government will take care of children orphaned from corona will give 4 thousand rupees every month in uttar pradesh