वाऱ्यामुळे उघडे पडू लागलेले मृतदेह झाकण्यासाठी योगी सरकारची धावपळ 

कोरोना संकटात गंगा किनारी पुरलेल्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाले होते, त्यामुळे योगी सरकारवर चौफेर टीका झाली होती. परंतु जेव्हा प्रयागराजमध्ये जोरदार पाऊस आणि वारा सुरू झाला तेव्हा हे मृतदेह उघडे पडू लागले. तसेच काही मृतदेहांचे भटके कुत्रे लचके तोडत असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते.

    दिल्ली: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा फटका उत्तरप्रदेशाला बसला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या असंख्य रुग्णांचे मृतदेह प्रयागराज जिल्ह्यातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर पुरण्यात आले आहेत. मात्र वाऱ्यामुळे यातील अनेक मृतदेह उघडे पडू लागल्याने उत्तरप्रदेश प्रशासनाची तारांबळ उडली आहे. उघडे पडलेले मृतदेहांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडू नये म्हणून प्रशासनाकडून मृतदेह पुन्हा वाळू टाकून पुरण्याची प्रयत्न केला जात आहे.

    गंगा किनारी पुरलेल्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर योगी सरकारवर मोठी टीका झाली होती. सद्यस्थितीला मृतदेहांची विटंबना रोखण्यसाठी महापौरांनी एक टीम स्थापित केली आहे. ही टीम या जागेवर लक्ष ठेवून आहे. तसेच या भागात मृतदेह दफन न करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

    कोरोना संकटात गंगा किनारी पुरलेल्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाले होते, त्यामुळे योगी सरकारवर चौफेर टीका झाली होती. परंतु जेव्हा प्रयागराजमध्ये जोरदार पाऊस आणि वारा सुरू झाला तेव्हा हे मृतदेह उघडे पडू लागले. तसेच काही मृतदेहांचे भटके कुत्रे लचके तोडत असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते.

    यापूर्वी जेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक नद्यांमध्ये मृतदेह तरंगताना आढळून आल्यानंतर दोन्ही राज्यांनी एकमेकांकडे बोट दाखवत हात वर केले होते.तसंच सरावासारवी करणारी उत्तरे दिली होती.