yogi

हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. उत्तर प्रदेशात वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे तसेच महिला सुरक्षेवरून कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.हाथरस प्रकरणावर बोलताना भाजपाच्या महासचिव कैलास विजयवर्गीय यांचे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. “आरोपींना अटक केली असून त्यांना तुरूंगात पाठवण्यात येणार असून, योगीजी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि तिथे कधीही गाडी उलटू शकते,”असं वक्तव्य भाजपा नेत्यानं केलं आहे.

 

विजयवर्गीय यांना पत्रकारांनी हाथरस प्रकरणी प्रश्न विचारला, यावर बोलताना भाजपाचे विजयवर्गीय म्हणाले,”आरोपींनी अटक झाली असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे. आरोपींना लवकरच तुरूंगात पाठवण्यात येणार आहे. योगीजी, जे की तिथले मुख्यमंत्री आहेत. मला माहिती आहे की, त्यांच्या प्रदेशात कधीही गाडी पलटी होते,” असं विधान कैलास विजयवर्गीय यांनी केलं आहे.

नेमका प्रकरण काय ?

दोन आठवड्यापूर्वी हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यांनतर तिच्यावर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर उत्तरप्रदेश राज्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.