वेगवेगळ्या धर्मांच्या सज्ञान तरुण-तरुणींना जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार, आई-वडीलही यात आड येऊ शकत नाहीत, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

वेगवेगळ्या धर्माच्या ( inter religious marriage) सज्ञान तरुण-तरुणींच्या संसारिक आयुष्यात  दखल देण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचे अलाहाबाद हायकोर्टाने ( Alahabad high court) स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या धर्माच्या पती-पत्नीच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यासही कोर्टाने मनाई केली आहे.

    अलाहाबाद (Alahabad)  – वेगवेगळ्या धर्माच्या ( inter religious marriage) सज्ञान तरुण-तरुणींच्या संसारिक आयुष्यात  दखल देण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचे अलाहाबाद हायकोर्टाने ( Alahabad high court) स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या धर्माच्या पती-पत्नीच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यासही कोर्टाने मनाई केली आहे. वेगवेगळे धर्म असले तरी आपला आयुष्याचा साथीदार निवडण्याचा सज्ञान तरुण, तरुणींना पूर्ण अधिकार असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यांचे आईवडीलांनाही यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

    अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश एम के गुप्ता आणि दीपक वर्मा या दोघांनी, शिफा हसन या तरुणीच्या याचिकेवर सुनावणीवेळी हा निर्णय दिला आहे. शिफा हसन या तरुणीने एका हिंदू तरुणाशी विवाह केला होता, आणि त्यानंतर गोरखपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हिंदू धर्म स्वीकारण्याची परवानगी मागितली होती.

    या तरुणीच्या निवेदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून रिपोर्ट मागवला होता. तरुणाचे वडील या लग्नामुळे समाधानी नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. मात्र या तरुणाची आई हे लग्न मान्य करण्यास तयार होती. दुसरीकडे तरुणीचे आई-वडील हे दोघेही या लग्नाच्या विरोधात होते. दोघांच्या पालकांकडून जीवाला धोका असल्याच्या कारणावरुन, या जोडीदारांनी हायकोर्टात संरक्षणासाठी अपिल केले होते.

    या याचिकेवेर सुनावणी करताना, सज्ञान तरुण-तरुणींना वेगळ्या धर्मातील आपला जीवन साथीदार निवडण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हायकोर्टानं दिला आहे. या दोघांच्या वैवाहिक आयुष्यावर शंका उपस्थित करण्याचा अधिकारी कुणालाही नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. याचबरोबर गोरखपूर पोलिसांना या दोघांना सुरक्षा देण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

    अलाहाबाद कोर्टाच्या या ताज्या निर्णयामुळे आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींचे मनोबल उंचावेल अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे.