zydus cadila

केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या(DCGI) समितीने जॉयकोव्ह-डीला(Permission To Use Zycov -D In India) मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या लसीला मंजुरी मिळाल्याने ही भारतात वापरली जाणारी सहावी लस आहे.

    भारतीयांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. कोव्हिशिल्ड(Covishield) आणि कोव्हॅक्सिननंतर(Covaxin) देशात बनलेल्या तिसऱ्या कोरोना लसीला(Corona Vaccine) मान्यता मिळाली आहे. केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या(DCGI) समितीने जॉयकोव्ह-डीला(Permission To Use Zycov -D In India) मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या लसीला मंजुरी मिळाल्याने ही भारतात वापरली जाणारी सहावी लस आहे. आतापर्यंत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला परवानगी दिली आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार, भारतात ५० पेक्षा जास्त केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती. भारतीय कंपनीने तयार केलेली जगातील पहिली डीएनए लस आहे, असा दावा जॉयडसने केला आहे.तसेच या लसीचे तीन डोस देणं आवश्यक आहे. अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या  झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी जॉयकोव्ह-डी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितली होती.