
पाण्याच्या प्रचंड आणि जोरदार प्रवाहात अनेक वाहने वाहून गेल्याने परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी काही फूट दूर पसरले.
गुवाहाटी : आसाममधील गुवाहाटीमध्ये काल पाण्याचं रौद्ररुप पाहायला मिळालं. शहरातील मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन (Pipeline) फुटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर पाण्यामुळे किमान 40 घरांचे नुकसान झाले आहे. गुवाहाटीतील खारगुली भागात ही घटना उघडकीस आली आहे.
नेमकं काय प्रकार
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रस्त्यावर पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या प्रचंड आणि जोरदार प्रवाहात अनेक वाहने वाहून गेल्याने परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी काही फूट दूर पसरले. या घटनेमुळे 600 हून अधिक लोक बाधित झाले आणि एका महिलेचा मृत्यू झाला. ही महिला पाईपलाईनच्या शेजारीच असलेल्या एका घरात राहत होती. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. या पाइपलाइनची देखभाल गॅमन JICA या कंपनीद्वारे केलं जातं. गुवाहाटी मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (GMDA) लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.