हिमाचल टिंबर ट्रेल रोपवेमध्ये अडकले ११ जण, ५ तास लटकली केबल कार, सर्वांची सुटका

त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लष्कराची मदत घेतली आहे. त्याचवेळी तांत्रिक बिघाडामुळे हवेत अडकलेली ट्रॉली दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक पथकही पोहोचले आहे.

    नवी दिल्ली – सोमवारी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील परवानू येथे टिंबर ट्रेल रोपवेमध्ये (Timber Trail ropeway) ११ लोक अडकले होते. ५ तास सर्वजण अडकून राहिले. यानंतर लगेचच सर्वांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू झाले. काही वेळातच सात जणांची दोरीच्या साहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली. यानंतर हळूहळू सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. (Everyone was rescued) सोलन जिल्हा प्रशासन आणि टिंबर ट्रेलच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी लोकांना बाहेर काढले. (Cable car stuck ) एनडीआरएफची टीमही तिथे पोहोचली होती.

    हे हॉटेल राज्याचे प्रवेशद्वार, परवानू जवळील टिंबर ट्रेलपासून 800 मीटर अंतरावर एका टेकडीवर आहे. रोपवेने लोक हॉटेलपर्यंत पोहोचतात. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ट्रॉलीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तेव्हापासून ट्रॉली हवेत लोंबकळत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सात जणांना दोरीच्या साह्याने वाचवण्यात यश आले असून त्यात पाच महिलांचा समावेश आहे. काही लोक दोरीवरून खाली उतरायला घाबरतात. त्यामुळे त्यांची सुटका करणे आव्हानात्मक बनले आहे.

    त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लष्कराची मदत घेतली आहे. त्याचवेळी तांत्रिक बिघाडामुळे हवेत अडकलेली ट्रॉली दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक पथकही पोहोचले आहे.

    ट्रॉलीमध्ये अडकलेले लोक दिल्लीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यामध्ये अनेक वयोवृद्ध आहेत, ज्यांना दोरीवरून खाली उतरताना त्रास होत आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेले लोक स्वत: व्हिडिओ बनवून मदतीचे आवाहन करत आहेत. डीसी सोलन कृतिका कुल्हारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावासाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले आहे. बचावकार्यात टीम गुंतलेली आहे.