गेल्या 24 तासांत देशात ११ हजार ७३९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 25 रुग्णांचा मृत्यू

देशात सध्या 92 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात 10 हजार 917 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

    देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतान दिसत आहे. कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट पाहायला मिळाली असली तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 11 हजार 739 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हा मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा आहे.

    देशात सध्या 92 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात 10 हजार 917 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 92 हजार 576 इतकी झाली आहे.