१२ राज्यसभा खासदार निलंबनावर आज तोडगा निघण्याची शक्यता, सरकारचे विरोधी पक्षांना चर्चेसाठी पाचारण

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले की, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांना आणि काँग्रेससह चार राजकीय पक्षांना बैठकीसाठी बोलावले आहे. ते म्हणाले की तृणमूल काँग्रेस, सीपीआय देखील संसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत होणाऱ्या बैठकीत बोलावण्यात आले आहे. ज्यांचे राज्यसभा सदस्य निलंबित करण्यात आले आहेत. सरकारने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी सकाळी विरोधी पक्षांची बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.

    संसदेत १२ खासदारांच्या निलंबनावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, निलंबन झालेल्या खासदारांच्या पक्षाच्या गटनेत्यांची आज बैठक बोलावण्यात आलीय. शिवसेनेचेही २ खासदार निलंबित झाल्यानं आजच्या या बैठकीचं आमंत्रण शिवसेनेलाही देण्यात आलंय. संसदेचं अधिवेशन २३ तारखेला संपणार आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्या आधी तीन दिवस तरी यावर तोडणार निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

    तर, या बैठकीला उपस्थिती राहायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षांनी बैठक घेतली. कारण संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्ष सातत्याने १२ खासदारांचा निलंबनाचा मुद्दा संसदेत मांडत आहेत, तसेच संसदेच्या बाहेर आंदोलनही करत आहेत.

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले की, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांना आणि काँग्रेससह चार राजकीय पक्षांना बैठकीसाठी बोलावले आहे. ते म्हणाले की तृणमूल काँग्रेस, सीपीआय देखील संसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत होणाऱ्या बैठकीत बोलावण्यात आले आहे. ज्यांचे राज्यसभा सदस्य निलंबित करण्यात आले आहेत. सरकारने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी सकाळी विरोधी पक्षांची बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.

    खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात मोर्चा काढला आणि सरकार विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेत्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ते संसद संकुलातील विजय चौकापर्यंत मोर्चा काढला.