new baby

पीडितांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात मुलांना योग्य वेळी ऑक्सिजन दिला गेला नाही, ज्यामुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड सुरू केली.

    नवी दिल्ली – ओडिशामध्ये १८ दिवसांत सरकारी रुग्णालयात १३ मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकरण राज्यातील क्योंझर जिल्ह्यातील आहे. जिथे मृत मुलांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात गोंधळ घातला. डॉक्टर आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

    पीडितांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात मुलांना योग्य वेळी ऑक्सिजन दिला गेला नाही, ज्यामुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड सुरू केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना शांत करण्यास सुरुवात केली.

    त्याचवेळी, ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री एनके दास यांनी या प्रकरणी क्योंझर प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगून मंत्री म्हणाले की, मुलांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते म्हणाले- मी क्योंझर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना या घटनेमागील कारणे शोधण्यास सांगितले आहे.

    माझ्या धाकट्या भावाच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर आणि परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. मुलाला आयसीयूमध्ये दाखल केले होते आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. इमर्जन्सीच्या प्रसंगी डॉक्टर आणि परिचारिका नेहमी उपलब्ध असायला हव्यात, मात्र शनिवारी रात्री ते हजर नव्हते. गंभीर आजारी मुलांवर उपचार सुरू असलेल्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटला (SNCU) डॉक्टरांनी भेट दिली नाही आणि त्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.