
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासात देशात १२ हजार ८९९ नव्या कोरोना (Corona Cases In Country) बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात १२ हजार ८९९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या २४ तासात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात दिल्लीसह महाराष्ट्रात रूग्णवाढ होताना दिसत आहे. दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.
सध्या एकूण देशात ७२ हजार ४७४ सक्रिय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर ८ हजार ५१८ रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या किंचित घसरली आहे. आदल्या दिवशी १३ हजार २१६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे, पण मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/JV2EgITq5E pic.twitter.com/Ms2HomzugF
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 19, 2022