जल्लीकट्टू ठरतोय जीवघेणा, बैलाने शिंग मारल्याने तामीळनाडूत 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

तामिळनाडूतील धर्मापुरी जिल्ह्यात 'जल्लीकट्टू' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बैल पकडण्याचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा बैलाने ठेचून मारला.

    तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू (Jalikattu ) कार्यक्रमादरम्यान एका 14 वर्षांच्या मुलाला बैलाने एवढ्या जोरात शिंग मारलं की त्याचा जागीच मृत्यू झाला. थडंगम गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोकुळ असं या दुर्देवी मुलांच नाव असून तो आपल्या नातेवाईकांसोबत जल्लीकट्टू पाहण्यासाठी गेला होता.

    बैलाने गोकुळच्या पोटावर केले वार

    घटनेच्या वेळी गोकुळ हे नातेवाईकांसह जल्लीकट्टू पाहण्यासाठी गेला होते. त्यावेळी एका बैलाने त्याच्या पोटावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. गोकुळला तत्काळ धर्मपुरी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच धर्मापुरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. गोकुळ या वर्षी जल्लीकट्टूशी संबंधित मृत्यू होणारा चौथा व्यक्ती आहे.

    यापूर्वी जल्लीकट्टू कार्यक्रमात २३ जण जखमी झाले होते.

    याआधी तामिळनाडूच्या अवनियापुरम गावात पोंगलच्या निमित्ताने जल्लीकट्टू कार्यक्रमात 23 जण जखमी झाले होते. तामिळनाडूमध्ये पोंगलदरम्यान गुरांची पूजा केली जाते. यामध्ये जल्लीकट्टू या नावाने एक कार्यक्रम आयोजित केला जातो. जल्लीकट्टू हा धोकादायक खेळ आहे. या खेळात बैलाला गर्दीत सोडले जाते. जल्लीकट्टूच्या खेळात खेळाडूंना मुक्त बैलावर नियंत्रण ठेवावे लागते. या खेळात बैलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खेळाडू उतरतात जल्लीकट्टूला एरु थाझुवुथल आणि मनकुविरट्टू असेही म्हणतात.