देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात 16 हजार 047 रुग्ण आढळले.

देशातील कोविड-19 बरे होण्याचा दर 98.52 टक्के होता, तर, मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. दैनंदिन पॅझिटिव्हीटी रेट 4.94 टक्के नोंदवण्यात आला असून साप्ताहिक पॅझिटिव्हिटी रेट 4.90 टक्के आहे

    देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर काही प्रमाणात काही होईना नियंत्रण मिळाल्याचं दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात 16 हजार 047 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 54 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    या रुग्णवाढीसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,41,90,697 वर गेली आहे तर आतापर्यंत 5,26,826 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या डेटामध्ये 24 तासांच्या कालावधीत सक्रिय रुग्णांची संख्या 3,546 ने कमी होऊन 1,28,261 वर आली आहे, जी आता एकूण संसर्गाच्या 0.29 टक्के आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

    दरम्यान, देशातील कोविड-19 बरे होण्याचा दर 98.52 टक्के होता, तर, मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. दैनंदिन पॅझिटिव्हीटी रेट 4.94 टक्के नोंदवण्यात आला असून साप्ताहिक पॅझिटिव्हिटी रेट 4.90 टक्के आहे. तसेच, आतापर्यंत देशात 4,35,35,610 इतके रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहे. तर, देशव्यापी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे २०७.०३ कोटी डोस देण्यात आले आहेत.