लैंगिक छळातून १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये शिक्षिकेला धरले दोषी

१८ मार्च रोजी विद्यार्थ्यांने तोरवा भागात फाशी घेतली. वडिलांपासून विभक्त झाल्यानंतर विद्यार्थी त्याच्या आईसोबत राहत होता. घटनेच्या वेळी त्याची आई मंदिरात गेली होती. शाळेच्या रसायनशास्त्राच्या शिक्षिकेने विद्याथ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. ती त्याला अश्लील मेसेज पाठवत आणि तिच्याशी शारीरिक संबंध बनवत असे.

    छत्तीसगडमध्ये लैंगिक छळातून १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यात शिक्षिकेला धरले दोषी धरण्यात आले आहे. घटनेच्या काही दिवस अगोदर महिला शिक्षक आणि विद्यार्थी मॉलमध्ये भेटल्या. विद्यार्थ्याने शिक्षकाचा मोबाइल केवळ १५ मिनिटांसाठी हातात घेत त्यांचा कॅमेरा आणि सोशल मीडिया अकाउंट हॅक केला होता.

    छत्तीसगडमध्ये लैंगिक छळाच्या प्रकरणात आत्महत्या करणार्‍या अल्पवयीन विद्यार्थ्याची बुद्धीमत्ता अलौकिक होती. इतकेच नव्हे तर त्याने विशेष अॅपच्या साहाय्याने कोडिंगच्या भाषेमध्ये सुसाइड नोट कोड लिहिला होता. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या केमिस्ट्री विषयाच्या शिक्षकासाठी सुसाइड नोटमध्ये लिहिले होते – मला माहित आहे की मी बेस्ट आहे, परंतु त्याने माझा नाश केला.

    विद्यार्थ्याने लिहिलेल्या सुसाइड नोटसाठी त्याने सायफर अ‍ॅप वापरला. यामध्ये नवीन शब्द तयार करण्यासाठी इंग्रजीच्या अक्षराचा क्रम बदलला जातो
    यामध्ये महिला शिक्षिकेने १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले आहे; विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर ५ दिवसांनी पोलिसांना सुसाईड नोट डीकोड करण्यास यश आले.

    शिक्षिकेचा मोबाइल व सोशल मीडिया अकाउंटही केले हॅक
    या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच मॉलमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची भेट झाल्याचेही पोलिस तपासात उघड झाले. विद्यार्थ्याला शिक्षिकेच्या प्रेमप्रकाराबद्दल आधीच संशय होता. यासाठी त्याने तिचा मोबाईल १५ मिनिटांसाठी मागितला आणि तो परत केला. दरम्यान विद्यार्थ्याने तिचा मोबाईल , कॅमेरा, सोशल मीडिया खाती हॅक केली. जेणेकरून जेव्हा शिक्षिका तिच्या प्रियकराशी बोलेल, तेव्हा त्या विद्यार्थ्यास माहिती होईल. आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने ही माहिती आपल्या फेसबुकवरही जाहीर केली होती.

    विद्यार्थ्याने घरातच गळफास लावून घेतला
    १८ मार्च रोजी विद्यार्थ्यांने तोरवा भागात फाशी घेतली. वडिलांपासून विभक्त झाल्यानंतर विद्यार्थी त्याच्या आईसोबत राहत होता. घटनेच्या वेळी त्याची आई मंदिरात गेली होती. शाळेच्या रसायनशास्त्राच्या शिक्षिकेने विद्याथ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. ती त्याला अश्लील मेसेज पाठवत आणि तिच्याशी शारीरिक संबंध बनवत असे. यावेळी विद्यार्थी तिच्यासोबत एकतर्फी प्रेमात पडला,मात्र शिक्षकेचे दुसर्या कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजताच विद्यार्थ्याने आत्महत्या केली.