देशात गेल्या 24 तासात 166 कोरोना रुग्णांची नोंद

देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत 90 ने घट झाली असून सध्या देशात 4 हजार 255 रुग्ण आहेत.

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना (Corona Cases In India) रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 166 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या  ४.४६ कोटीवर पोहोचली आहे.

    तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्येतही घट झाल्याच पाहायला मिळत आहे. देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत 90 ने घट झाली असून  सध्या देशात 4  हजार 255  रुग्ण आहेत. दरम्यान, देशात गेल्या 24 तासात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एकाचा तर केरळमधील तीन मृत्यूंचा समावेश आहे. या पाच मृत्यूंसह मृतांची संख्या देशातील एकूम मृतांची संख्या 5,30,638 वर पोहोचली आहे.

    तर,  मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.94 कोटी डोस देण्यात आले आहेत.