मध्यप्रदेशात भीषण दुर्घटना! करौली माता मंदिरात जाणारे 17 भाविक चंबळ नदीत वाहून गेले, 3 मृतदेह काढले बाहेर

नदीत बुडालेल्यांमध्ये महिला आणि पुरुष भाविकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुरैना : मध्य प्रदेशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुरैना जिल्ह्यात चंबळ नदी (Chambal Rive) ओलांडताना 17 यात्रेकरू नदीतच वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने 8 जण पोहून राजस्थानच्या दिशेने निघाले तर 7 जण पाण्यात बुडाले. बचाव पथकाने 3 जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. तर, 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. ही घटना तेंत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायडी-राधेन घाटातील घडल्याचं सांगण्यात येत आहे. चंबळ नदीत बुडालेले सर्व भाविक शिवपुरी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुरी जिल्ह्यातील सिलाईचौन गावात राहणारे कुशवाह समाजाचे १७ लोक पायी चालत करौली माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते.भाविकांमध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश होता.आज शनिवारी सकाळी मुरैना जिल्ह्यातील टेंटारा पोलीस स्टेशन हद्दीतील रायडी-राधेन घाट येथे भाविक चंबळ नदी ओलांडत होते, त्यावेळी सर्व लोक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागले.यातील 8 जण पोहत नदीच्या दोन्ही घाटांवर पोहोचले, तर 7 जण पाण्यात बुडाले.

याची माहिती स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलीस व जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी बचाव पथकाला पाचारण करून बचावकार्य सुरू केले. सुमारे 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर गोताखोरांनी एका महिलेसह तीन जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. नदीत बुडालेल्यांमध्ये महिला आणि पुरुष भाविकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.  माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.