आगीत कपडे जळून खाक, घराबाहेर पुरुष उभे होते म्हणून आल्या नाहीत बाहेर, अब्रू वाचवण्याच्या प्रयत्नात 17 महिलांनी गमावला जीव

महिलांचे कपडे पुर्ण जळाल्यामुळे त्यांना विना कपड्याच्या घराबाहेर येण्यास लाज वाटल्याने त्या परत घरात गेल्या आणि वाढलेल्या आगीने त्यांना कवेत घेतल्यामुळे 17 महिलांचा मृत्यू झाला.

    जोधपूर : काही दिवसांपुर्वी राजस्थानच्या जोधपूरमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट प्रकरणी हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. स्फोटात आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की लोकांची कातडी वितळली आणि घराच्या दारांना आणि भिंतींना चिकटली होती. तर,  महिलांचे कपडे पुर्ण जळाल्यामुळे त्यांना विना कपड्याच्या घराबाहेर येण्यास लाज वाटल्याने त्या परत घरात गेल्या आणि वाढलेल्या आगीने त्यांना कवेत घेतल्यामुळे 17 महिलांचा मृत्यू झाला.

    17 महिलांचा मृत्यू

    जोधपूर सिलिंडरचा स्फोटची भीषणाता दर्शवणारी माहिती समोर आली आहे. आगीने रौद्ररुप धारण करताच घरातील महिलांचे कपडे जळू लागले, जीव वाचवण्यासाठी महिलांनी घराबाहेर पळ काढला, मात्र समोर कुटुंबीय व नातेवाईक पाहून लाजेने त्या पुन्हा घराच्या आत गेल्या. पुन्हा आगीने त्यांना बाहेर पडण्याची संधी दिली नाही. या महिलांनी आपली अब्रू वाचवण्यासाठी स्वत जीव देणे पसंत केले. त्या दिवशी महिलांनी कपड्यांकडे लक्ष दिले नसते तर कदाचित कमी मृत्यू झाला असता. अपघात झाला तेव्हा घरात शेकडो लोक उपस्थित होते, त्यापैकी ५८ जण भाजले होते.

    घराबाहेर उभे होते पुरुष

     

    गावात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक कल्याण सिंह म्हणाले की, त्या दिवशी मी घराबाहेर उभा होतो. लग्नाची मिरवणूक निघणार होती. स्त्रिया वराला निरोप देण्याच्या तयारीत मग्न होत्या, तर बाकीच्या महिला गाणी म्हणत होत्या. घरात 30 हून अधिक महिला आणि 15 हून अधिक मुले होती. घरात ज्यावेळी सिलिंडरचा स्फोट झाला त्यावेळी सर्वात आधी त्याची झळ लहान मुलांना सर्वाधिक बसली. मग महिला. या वेळी पुरुष एकतर खोल्यांमध्ये होते किंवा मिरवणूक निघण्याची वाट पाहत बाहेर उभे होते. आग इतकी वेगाने पसरली की महिलांचे संपूर्ण कपडे जळून खाक झाले. काही महिला बाहेर पळू लागल्या, मात्र त्यांच्यासमोर पुरुष उभे होते, अशा स्थितीत अंगावर कपडे नसल्यामुळे लाजेपोटी त्यांना कुठं जावं कळलं नाही. मिळेल त्या वाटेेने त्या धावत सुटल्या.मात्र बघता बघता काही सेकंदातच आग घरभर पसरली होती. यामुळेच अपघातात सर्वाधिक महिलांचा मृत्यू झाला.