गेल्या २४ तासात देशात 17,336 नवीन कोरोना बाधितांची नोंद! गेल्या 100 दिवसांतील सर्वाधिक रुग्ण वाढ

भारतात सध्या 88 हजार 284 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.59 टक्के इतकं आहे.

    गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासात देशात 17,336 नव्या कोरोना (Corona Cases In Country) बाधितांची नोंद करण्यात आली आहे. ही मागील 100 दिवसांमधील सर्वाधिक रुग्णवाढ आहे.

    देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात 17,336 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या २४ तासात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात दिल्लीसह महाराष्ट्रात रूग्णवाढ होताना दिसत आहे. दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे. तर, देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 24 954 वर पोहोचली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जारी करत देशातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीची माहिती दिली आहे.

    कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना आता काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 88 हजारांच्या पुढे गेला आहे. भारतात सध्या 88 हजार 284 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.59 टक्के इतकं आहे.