narayan nand maharaj

सोशल मीडियावर सध्या एका महाराजांची खूप चर्चा सुरु आहे. हे महाराज जगातील सगळ्यात लहान साधू असल्याचे सांगितले जात आहे. स्वामी नारायण नंद बाबांची(swami narayan nand baba) उंची १८ इंच आहे. तसेच त्यांचे वजन १८ किलोग्राम आहे. त्यांचे वय ५५ वर्ष आहे.

    स्वामी नारायण नंद महाराजांना उभं राहता येत नसल्याने त्यांचे शिष्यच त्यांची काळजी घेतात.

    महाराजांचा एक व्हिडिओ रॉयटर्सने शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी बघितला आहे. नंद महाराज हरिद्वारमधील महाकुंभसाठी सध्या आले आहेत. नंद महाराज हे मुळचे झांसीचे रहिवासी आहेत. ते नागा साधू आहेत. त्यांचे आधीचे नाव सत्यनारायण पाठक असे होते. नागा साधू झाल्यावर त्यांचे नाव स्वामी नारायण नंद महाराज, असे ठेवण्यात आले.