मोठी बातमी! 1984 सालातील शीखविरोधी दंगलीमधील प्रमुख आरोपी कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता

    नवी दिल्ली : देशात सर्वात मोठी दंगल म्हणून ओळख असलेल्या 1984 साली झालेली पंजाबमधील शीखविरोधी दंगल फार मोठी होती. दिल्लीत 1984 झालेल्या शीख विरोधी दंगलीतील एका प्रकरणात आज मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने शीख विरोधी दंगलीदरम्यान सुलतानपुरी येथे झालेल्या एका प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण तीन शीखांच्या कथित हत्येशी संबंधित होते.