विराट कोहलीकडून के एल राहुलला दोन कोटींची कार; धोनीनंही भेट दिली ‘स्पेशल’ बाईक

भारतीय (India) संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने (K L Rahul) बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी (Athiya Shetti) लग्न केले आहे. 23 जानेवारीला दोघांचे लग्न झाले. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.

  मुंबई : भारतीय (India) संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने (K L Rahul) बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी (Athiya Shetti) लग्न केले आहे. 23 जानेवारीला दोघांचे लग्न झाले. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांसोबतच क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू लग्नाला पोहोचू शकले नाहीत. हे सर्वजण न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळत होते.

  कोहलीने दिली कोटींची भेट

  विराट कोहलीने लग्नाला हजेरी लावली नाही पण केएल राहुलला करोडोंची भेट दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने त्याचे सहकारी खेळाडू राहुल आणि अथिया यांना बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली आहे. गिफ्ट केलेल्या कारची किंमत 2.17 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल हा विराट कोहलीच्या अगदी जवळचा मानला जातो.

  धोनीकडूनही गिफ्ट मिळाली

  विराट कोहलीप्रमाणेच माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही केएल राहुलला गिफ्ट केल्याचे सांगितले जात आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर धोनीने राहुलला कावासाकी निन्जा बाईक भेट दिली आहे. त्याची किंमत 80 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार असलेल्या धोनीला बाइक्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे जगातील टॉप बाइक्स आहेत.

  पुढील महिन्यात मैदानात परतेल

  केएल राहुल पुढील महिन्यात मैदानात परतणार आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी त्याला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. बांगलादेश दौऱ्यावर कसोटीचे कर्णधारपद भूषवणारा राहुल सातत्याने फलंदाजीत फ्लॉप होत आहे. या कारणामुळे त्याच्याकडून एकदिवसीय आणि टी-२० चे कर्णधारपद हिसकावण्यात आले आहे. कसोटीतही त्याची बॅट सातत्याने शांत असते. अशा परिस्थितीत संघात असण्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी दिल्यास राहुलसमोर स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान असेल.