उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; ट्रकने स्कूटी 500 मीटरपर्यंत खेचत नेली, तीन वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू

शाहजहांपूरमधील कटरा ओव्हरब्रिजजवळ शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमधून रस्ते अपघाताची एक मोठी घटना समोर येत आहे. शाहजहांपूरमध्ये एका ट्रकने स्कूटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातातएका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला.  ह हा अपघात भीषण होता की, ट्रकने स्कूटीला जवळपास 500 मीटरपर्यंत खेचत नेलं.

कुठे घडली घटना

शाहजहांपूरमधील कटरा ओव्हरब्रिजजवळ शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात मदीन (४०), त्यांची मेहुणी सुरजा देवी (३५) आणि त्यांचा तीन वर्षांचा पुतण्याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर स्कूटी ट्रकमध्ये अडकली आणि सुमारे 500 मीटरपर्यंत ओढली गेली.  घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तिघांनाही उपचारासाठी बरेली रुग्णालयात पाठवले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यापूर्वीही घडली अशी घटना

यापूर्वी उत्तरप्रदेशच्या महोबामध्ये अशी घटना घडली होती. तेव्हा भरधाव वेगात असलेल्या डंपरने स्कूटीवर बसलेल्या आजोबा आणि नातवाला उडवले होते. भरधाव वाहनाने स्कूटीमध्ये अडकलेल्या दोघांना 2 किलोमीटरपर्यंत ओढत नेले होते. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी चालकाला डंपर थांबवण्याचा इशारा केला, मात्र त्याने वाहनाचा वेग वाढवला. यानंतर दगडफेक होत असताना डंपर थांबला. अपघातानंतर दोन्ही जखमींना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.