धक्कादायक! 5 तासात 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनं हादरलं कोटा, आता रविवारी No Test, No Study जिल्ह्याधिकांऱ्यांचा आदेश

जिल्हाधिकारी ओ.पी.बनकर म्हणाले की, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण जास्त असून त्यामुळेच आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

    कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा (Kota Students Suicide) होण्याच्या घटना  थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. या घटनांना आळा बसावा यासाठी प्रशासानाचे प्रयत्न चालू असताना आता पाच तासांत २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या वाढत्या घटना  पाहता राजस्थान प्रशासन आणि कोटा जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलली आहेत. ज्या अंतर्गत रविवारी No Test, No Study असा आदेश काढला आहे. म्हणजे आता रविवारी विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

    नेमका प्रकार काय?

    राजस्थानचं कोटा शहर आता आत्महत्येचे शहर बनत आहे. कोटा येथे २४ तासांत दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने संपूर्ण व्यवस्थापन हादरले आहे. त्यामुळे कोटाचे जिल्हाधिकारी ओपी बनकर यांनी आदेश जारी केला आहे की आता विद्यार्थ्यांना रविवारी सुट्टी दिली जाईल. रविवारी कोणताही अभ्यास आणि चाचणी होणार नाही. सध्या हा आदेश पुढील 2 महिन्यांसाठी काढण्यात आला आहे आणि जर या 2 महिन्यांत हा आदेश योग्य रीतीने कार्य करत असेल, तर दर रविवारी कोटा कोचिंग ऑपरेटर परीक्षा देऊ शकणार नाहीत. जिल्हाधिकारी ओ.पी.बनकर म्हणाले की, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण जास्त असून त्यामुळेच आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

    मुख्यमंत्र्यांनी कोचिंग क्लास ऑपरेटरशी साधला होता संवाद

    मागील आठवड्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोटा येथे कोचिंग क्लास ऑपरेटरशी संवाद साधला होता. कोटा येथे वारंवार होत असलेल्या आत्महत्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी कोचिंग चालकांशी बोलून विद्यार्थ्यांना अडचणीत येऊ नये यासाठी पावले उचलण्यास सांगितले होते. प्रत्येक मुलाचे जीवन महत्त्वाचे आहे. जीवन असेल तर मूल बनू शकेल. करिअर, जीवन नसेल तर सर्व काही संपेल .मुख्यमंत्री अशोक यांनी कोटा जिल्ह्यातील कोचिंग ऑपरेटर्सचा अहवाल जिल्हाधिकारी ओपी बनकर यांच्याकडून मागवला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आणि मुख्यमंत्रासोबत झालेली बैठकही निष्पळ ठरल्याचं दिसत आहे.
    रविवारी संध्याकाळी कोटामध्ये पुन्हा 5 तासात दोन मुलांनी जीव दिला. या दोन मुलांच्या मृत्यूनंतर आता कोटा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.