netaji bose-and-andaman

अंदमान-निकोबार द्विपसमुहावर (Andaman Nicobar Island) 21 अनामिक द्विपांचं नामकरण आज 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या नावानं करण्यात आलंय. हे द्विप आणि नेताजी  (Netaji And Andaman Nicobar Connection) यांचं काय नातं आहे. हे जाणून घेऊयात.

  नवी दिल्ली: नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchandra bose) यांची आज जयंती. आजचा दिवस देशात पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. त्यातही अंदमान-निकोबार या द्विपसमुहावर यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यातील 21 अनामिक द्विपांचं नामकरण आज 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या नावानं करण्यात आलंय. हे द्विप आणि नेताजी  (Netaji And Andaman Nicobar Connection) यांचं काय नातं आहे. हे जाणून घेऊयात.

  1. अ्ंदमान-निकोबार द्विप समूह आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात खास नातं होतं. नेताजी पहिल्यांदा 1943 साली निकोबार बेटाच्या पोर्ट ब्लेयरवर पोहचले होते. तीन दिवस नेताजी या ठिकाणी थांबले होते. जिमखाना ग्राऊंडवर 30 डिसेंबर 1943साली त्यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता.

  2. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपाननं अंदमान आणि निकोबांर द्विप समुहांवर ताबा मिळवला होता. हे द्विप समूह 1942 ते 1945 या काळापर्यंत जपानच्या ताब्यात होते. त्यानंतर 29 डिसेंबर 1943 रोजी हे द्विप समूह सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेकडं सोपवण्यात आले. मात्र यावर प्रत्यक्ष नियंत्रण हे जपानकडेच होतं.

  3.जपानच्या आधी या द्विपांवर हॉलंडनं कब्जा केला होता. त्यानंतर हे द्विप इंग्रजांकडं गेले. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर हे द्विप पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेले.

  4. जपापनं जेव्हा हे द्विप आझाद हिंद सेनेला सोपवले होते. त्यावेळी 30 डिसेंबर 1943 रोजी या ठिकाणी पहिल्यांदा तिरंगा फडकावण्यात आला. नेताजी यांनी अंदमानचं नाव शहीद तर निकोबारचं नाव स्वराज्य असं नामकरण केलं होतं. आझाद हिंद सेनेचे जनरल लोकनाथन यांना गव्हर्नरपदाची धुरा देण्यात आली होती. 947  साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा भाग केंद्रशासित प्रदेश झाला.

  5. इंग्रजांनी या ठिकाणी सेल्युलर जेल निर्माण केले होते. त्यात क्रांतिकारकांना ठेवण्यात येत असे. त्या ठिकाणी त्यांचा अनन्वित छळ करण्यात येत असे. त्यामुळं या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा असे संबोधले जाई. हे जेल पोर्ट ब्लेयरमध्ये होते. तिथे 694 कोठड्या होत्या.

  6.स्वातंत्र्यवीर सावरकर, बुटकेश्वर दत्त या सारख्या स्वातंत्र्यसेनानींनी या ठिकाणी शिक्षा भोगली होती. सद्यस्थितीत हा जेल परिसर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणारं केंद्र आहे. या द्विप समुहातील एका द्विपाला नेताजींचं नाव देण्यात आलं होतं. हा द्विप प्रदेश 200 एकर परिसरात फैलावलेला आहे.

  7. या द्विप समुहांचा इतिहास भारतातील स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचा पडाव मानण्यात येतो. अंदमान शब्दाची उत्पत्ती ही मलय यांच्यापासून झालेली आहे. प्राचीन काळी याच ठिकाणाहून अनेक गुलाम आणण्यात येत असतं.

  8. मयल लोक हे समुद्र यात्रा करीत असत. या काळात अशा द्विप समुहांवर असलेल्या अदिवासींना कैद करुन ते नेत. त्यांच्याकडून गुलामगिरी करवून घेण्यात येत असे. या द्विपसमुहाला आधी हदुंमान असे संबोधण्यात येत असे. हनुमानाच्या नावाशी याचा संबंध असल्याचे सांगण्यात येत असे. त्यानंतर या नावाचा अपभ्रंभ होऊन त्याचे नाव अंदमान करण्यात आलं.