पुराव्यांअभावी गुजरात दंगलीतील 22 आरोपींची निर्दोष मुक्तता, 2 मुलांसह 17 जणांच्या हत्येचा आणि मृतदेह जाळण्याचा होता आरोप

या हत्याकांडानंतर हत्या आमि दंगलीच्या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 2004 साली दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणात नव्याने गुन्हे दाखल केले आणि या दंगलीत समावेश असण्याचा आरोप असणाऱ्या 22 जणांना अटक करण्यात आली होती.

  अहमदाबाद- गुजरातमध्ये (Gujarat Riots) 2002 साली झालेल्या गोधरा दंगल प्रकरणातील (Godhra Riots ) एका प्रकरणात 22 आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टानं केली आहे. या 22 जणांवर 17 जणांची हत्या केल्याचा आणि त्यांचे म-तदेह जाळल्याचा आरोप होता. यासह दंगल भडकवल्याचा आरोपही या 22 जणांवर होता. पंचमहल परिसरात असलेल्या हलोलमध्ये ही दंगल झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी 22 जणांना आरोपी केले होते. त्यातील 8 जणांचा सुनावणीच्या काळात मृत्यू झाला होता.

  या 22 जणांचे वकील गोपालसिंह सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांच्या खंडपीठानं या 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय. या 22 जणांविरोओधात ठोस पुरावे नसल्यानं त्यांची मुक्तता करण्यात येत असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. या प्रकरणाची सुनावणी हलोलच्या एका कोर्टात झाली.

  पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आले

  पीडितांच्या वकिलांनी कोर्टात साांगितलं की, 28 फेब्रुवारी 2002 रोजी पंचमहल जिल्ह्यात हलोलमध्ये 17 जणांची हत्या करण्यात आली होती. यात 2 मुलांचा समावेश होता. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी या दंगेखोरांनी हे मृतदेह जाळून टाकले. 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्सप्रेसमधील बोगीला आग लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही दंगल घडवण्यात आली होती.

  या हत्याकांडानंतर हत्या आमि दंगलीच्या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 2004 साली दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणात नव्याने गुन्हे दाखल केले आणि या दंगलीत समावेश असण्याचा आरोप असणाऱ्या 22 जणांना अटक करण्यात आली होती.

  या खटल्यातील साक्षीदार उलटले

  या 22 आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींविरोधात, दुसऱ्या पक्षकाराला पुरावे सादर करता आले नाहीत. इतकंच नाही तर या प्रकरणातील साक्षीदारही पलटले असल्याची माहिती त्यांनी दिलीय. या 22 जणांचे मृतदेहच सापडले नसल्याचंही सांगण्यात आलंय. पोलिसांनी एका नदीच्या किनाऱ्यावरुन काही हाडं जप्त केली होती. मात्र ही हाडं मृत व्यक्तींचीच आहेत, हे कोर्टात सिद्ध करता आलं नाही.