
आज 226 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच गेल्या 24 तासात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना (Corona Cases In India) रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 250 पेक्षा कमी रुग्णांची नोंद करण्यात आली. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत 68 ने घट झाली असून सध्या देशात 4 हजार 529 रुग्ण आहेत.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरापासून सलग पाचशेच्या आत असल्याचं निर्दशनास येत आहे. काल देशात 253 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर आज 226 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच गेल्या 24 तासात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ओडिशाचा असल्याची माहिती आहे. देशातील एकूण मृतांचा आकडा 5,30,6278 वर पोहोचला आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.93 कोटी डोस देण्यात आले आहेत.