देशात गेल्या 24 तासात 275 कोरोना रुग्णांची नोंद, एप्रिल 2020 नतंरची कमी रुग्णसंख्या

कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 98.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 98.80 टक्के झाला आहे.

    नवी दिल्ली : देशात कोरोना संपण्याच्या मार्गावर असल्याची चिन्ह दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे देशभरात कोरोनाचे केवळ 275 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

    देशातील कोरोना रुग्णवाढी संदर्भात दिवसेंदिवस येणारे आकडे हे दिलासादायक आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.  गेल्या 24 तासात 275 रुग्णांची नोंद करण्यात आली.  एप्रिल 2020 नंतर आज सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 6 एप्रिल 2020 रोजी कोरोनाचे 489 रुग्ण आढळले होते.

    आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार कोरोनामुळे दोन रुग्णांचाही मृत्यू झाला. याशिवाय, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,672 वर आली आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5,30,624 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर,  कोरोनामुळे केरळ आणि छत्तीसगडमध्ये गेल्या २४ तासांत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 5,30,624 झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.01 टक्के आहेत. कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 98.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 98.80 टक्के झाला आहे.  तर, कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या ४,४१,३७,६१७ वर पोहोचली आहे, तर मृत्यूदर १.१९ टक्के नोंदवला गेला आहे. देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत लसींचे 219.93 कोटी डोस देण्यात आले आहेत.