डंपरची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात; पती-पत्नीसह तीन वर्षांची बालिका ठार

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात (Accident in Indore) डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये डंपरची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात पती-पत्नीसह त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा (3 Killed in Indore Accident) मृत्यू झाला.

  इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Accident in Indore) डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये डंपरची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात पती-पत्नीसह त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा (3 Killed in Indore Accident) मृत्यू झाला. हा अपघात खजराना बायपासवर झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून तिघे जात होते. यावेळी दुचाकीस्वाराने डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या ओव्हरटेकमध्येच डंपरची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. नंतर या मुलीचाही मृत्यू झाला. खजराना बायपासवर हा अपघात झाला. याबाबतची माहिती खजराना पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.

  डंपरचालक ताब्यात

  याप्रकरणी पोलिसांनी डंपरचालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून आधारकार्ड मिळाले आहे. या प्रकणाचा पोलीस तपास करत आहेत.

  ओव्हरटेक करताना अपघात

  दुचाकीस्वाराने डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या ओव्हरटेकमध्येच डंपरची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली.