दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णांची घटतेय संख्या, 24 तासात 3 हजार 615 नव्या रुग्णाची नोंद

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, भारतात आतापर्यंत 217.96 कोटींहून कोरोना लसीचं वाटप विविध देशात करण्यात आले आहे. यामध्ये 94.80 कोटी दुसरा डोस आहे तर इतर 20.69 कोटी तिसचा डोस आहे

    सणासुदीच्या दिवसात नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. दिलासादायक म्हणजे कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं घट होत असून आता गेल्या 24 तासात 3 हजार 615 नव्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर, 22 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

    गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णांमध्ये 1 हजार 378 रुग्णांची घट झाल्याची पाहायला मिळालं. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 40,979 वर आली आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्याच्या वतीने देण्यात आली. 22 मृत्यूंसह देशातील एकूण मृतांची संख्या 5,28,584 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये केरळमध्ये झालेल्या आठ मृत्यूंचा समावेश आहे. तर देशातील एकूण रुग्णामध्ये ०.०९ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर कोरोना बरे होण्याचा दर ९८.७२ टक्के झाला आहे.

    दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, भारतात आतापर्यंत 217.96 कोटींहून कोरोना लसीचं वाटप विविध देशात करण्यात आले आहे. यामध्ये 94.80 कोटी दुसरा डोस आहे तर इतर 20.69 कोटी तिसचा डोस आहे.

    आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 89.44 कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत ज्यापैकी 3,23,293 चाचण्या गेल्या 24 तासांत घेण्यात आल्या.दरम्यान, 203.30 कोटींहून अधिक म्हणजे 2,03,30,10,225 लसीचे डोस आतापर्यंत राज्य/केंद्रशासित प्रदेशांना भारत सरकारच्या मोफत चॅनेलद्वारे आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे प्रदान करण्यात आले आहेत. तर, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे 2.76 कोटींहून अधिक शिल्लक आणि अप्रयुक्त कोविड लसीचे डोस अजूनही उपलब्ध आहेत.