अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरपेक्षा जम्मू अधिक संवेदनशील! रस्ता रुंदीकरणामुळे प्रवास सुकर झाला, मात्र आतापर्यंत 30 प्रवाशांचा मृत्यू

अमरनाथ यात्रसाठी 9200 हून अधिक भाविकांची तुकडी काश्मीरला रवाना झाली आहे. मात्र आतापर्यंत विविध कारणामुळे 30 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

    श्री अमरनाथ (Amarnath Yatra 2023) या पवित्र गुहेची यात्रा करणार्‍या भाविकांची संख्येने अवघ्या 21 दिवसांत तीन लाखांचा आकडा पार केला आहे. जो गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. १ जुलैपासून सुरू झालेली बाबा अमरनाथ यात्रा यावेळी ६२ दिवसांची आहे. मात्र, या चालू यात्रेदरम्यान मृतांची संख्या ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

    अमरनाथ यात्रेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली, बाबा बर्फानीचा दिव्य  दरबारात देशभरातून लोक येत आहेत. “सरकारने वीज, आरोग्य, रस्ते, स्वच्छता आणि रस्ते वाहतूक, हेलिपॅड सेवा, वाहतूक सेवा आणि इतर सर्व सेवांच्या भौतिक पायाभूत सुविधांचा योग्य विकास केला आहे, याचा पुरावा आहे.

    तसेचस बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने बर्फ हटवण्याचे आणि अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंसाठी मार्ग तयार करण्याचे काम केले. रस्त्याच्या देखभालीची जबाबदारीही बीआरओची आहे. BRO ने प्रोजेक्ट बीकन लाँच केले आहे, रस्ते रुंद केले आहेत, मजबूत हँडरेल्स आणि रेलिंग बसवले आहेत. बालटाल ते अमरनाथ गुहा हा मार्ग धोकादायक मानला जात होता. रस्ता रुंदीकरणामुळे प्रवास सुकर झाला आहे त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोईचे होत आहे.