बाबरी मशीद विध्वंसाला ३० वर्षे पूर्ण; अयोध्येत हाय अलर्ट

६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केला होता. या घटनेमुळे देशभर दंगल उसळली होती. त्यात दोन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. राम मंदिराच्या ठिकाणी सोळाव्या शतकात बाबरी मशीद बांधण्यात आली होती, असे मत कार सेवकांचे होते.

    नवी दिल्ली : बाबरी मशिदीच्या (Babri Mosque) विद्ध्वंस घटनेला आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने हाय अलर्ट (UP Alert) जारी केला असून मथुरेत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अखिल भारत हिंदू महासभेने (Akhil Bhartiya Hindu Mahasabha) मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-इदगाह संकुलात लाडू गोपाळाचा जलाभिषेक आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचण्याची परवानगी मागितली. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

    ६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केला होता. या घटनेमुळे देशभर दंगल उसळली होती. त्यात दोन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. राम मंदिराच्या (Ram Mandir) ठिकाणी सोळाव्या शतकात बाबरी मशीद बांधण्यात आली होती, असे मत कार सेवकांचे होते.

    इदगाह मशिदीजवळील रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. शाही ईदगाह येथे सकाळी लाडू गोपाळांचा जलाभिषेक करण्यासाठी आलेला हिंदू महासभेचा कार्यकर्ता सौरभ शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मा यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्याला हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखले तर आत्महत्या करेल असे म्हटले आहे. सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा राजश्री चौधरी मथुरेत पोहोचल्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणतू तथा महासभेच्या अध्यक्षा राजश्री चौधरी या १६ नोव्हेंबरला वाराणसीला गेल्या होत्या. त्यांनी ६ डिसेंबर रोजी श्री कृष्ण जन्मस्थळी मथुरा चलोचा नारा दिला.