राजस्थानातील २ लाख गायींमध्ये धोकादायक लंपी आजार, आतापर्यंत ३१२५ गायींचा मृत्यू

राजस्थानमध्ये सुमारे २ लाख गायींना संसर्ग झाला आहे. शासनाच्या सर्वेक्षणात ३१२५ गायींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. संसर्ग पसरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये ७० ते ८० लाख गुरे आहेत. आतापर्यंत आजारी आढळलेल्या ७८ ते ८० हजार गायींवर उपचार सुरू आहेत.

    नवी दिल्ली – राजस्थान, गुजरातसह १० राज्यांमध्ये गाय आणि म्हशींमध्ये घातक लम्पी विषाणूचा संसर्ग वाढला आहे. राजस्थानमध्ये सुमारे २ लाख गायींना संसर्ग झाला आहे. शासनाच्या सर्वेक्षणात ३१२५ गायींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. संसर्ग पसरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये ७० ते ८० लाख गुरे आहेत. आतापर्यंत आजारी आढळलेल्या ७८ ते ८० हजार गायींवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, लंपी संसर्गामुळे गुजरातमधील परिस्थिती भयावह बनली आहे. विशेषत: कच्छ आणि सौराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात गायींचा वावर आहे.

    राजस्थान सरकारने बाधित जिल्ह्यांमध्ये औषध खरेदीसाठी २ ते १२ लाख रुपयांचे बजेट दिले आहे. जिल्ह्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. आता जेनेरिकसह ब्रँडेड औषधेही जिल्हास्तरावरच खरेदी करता येणार आहेत. बुधवारी जयपूरहून जोधपूरला औषधाची खेपही पाठवली जात आहे. विभागीय मुख्यालय कार्यालय- अजमेर, बिकानेर आणि जोधपूर यांना रु. ८ ते १२ लाख आणि उर्वरित बाधित जिल्ह्यांना रु. २ ते ८ लाखांचे बजेट देण्यात आले आहे. हे आधीच जाहीर केलेल्या आणीबाणीच्या बजेटच्या व्यतिरिक्त आहे.