१० वर्षांच्या मुलाने बँकेतून उडवले ३५ लाख

या घटनेची माहिती मिळताच एसपी सिटी वजीर सिंह संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले. तपासानंतर एसपींनी सांगितले की, सकाळी ११.३० च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा बँकेत आला आणि 35 लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळून गेला.

    नवी दिल्ली – पंजाबच्या पटियाला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पटियातील मुख्य शाखेतून १० वर्षांचा एक मुलगा बॅग घेऊन पळाला. ही लाखो रुपयांची रक्कम बँकेच्या बाहेरच असलेल्या एटीएममध्ये टाकण्यासा ठेवण्यात आली होती. बॅग गायब झाल्याची बातमी पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. घाईघाईमने या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

    या घटनेची माहिती मिळताच एसपी सिटी वजीर सिंह संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले. तपासानंतर एसपींनी सांगितले की, सकाळी ११.३० च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा बँकेत आला आणि ३५ लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळून गेला. याआधी त्यांनी बँकेत२० मिनिटे रेकी केली. संधी मिळताच तो बॅग घेऊन पसार झाला.

    एसबीआयमध्ये ज्या पद्धतीने हा गुन्हा करण्यात आला आहे, तो विचारपूर्वक केलेला कट होता. चोरी केलेला मुलगाही कुख्यात चोर टोळीचा सदस्य असल्याचे समजते. पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली असून पैशाची बॅग घेऊन बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलाचा शोध सुरू आहे.