गेल्या 24 तासात देशात 389 नवे रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

दरम्यान, आतापर्यंत देशात 4,41,35,216 लोकांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्के नोंदवण्यात आला आहे.

    दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. कमी होणारी ही रुग्णसंख्या नागरिकांना दिलासा देणारी आहे. शुक्रवारी देशात केवळ 347 नव्या कोरोना रुग्णांची  नोंद करण्यात आली आहे. तर आज, गेल्या 24 तासात देशात 389 नवे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,46,71,219 वर पोहोचली आहे.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील तर सक्रिय रुग्णांची संख्याही घटत असून सध्या देशात 5,395 सक्रिय रुग्ण आहेत. तर,गेल्या 24 तासात देशात तीन जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशातील एकूण मृतांची संख्या 5,30,608 वर पोहोचली आहे. सक्रिय प्रकरणे एकूण संक्रमणांपैकी 0.01 टक्के आहेत, तर कोरोनाचा रिकव्हरी रेट 98.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दरम्यान, आतापर्यंत देशात 4,41,35,216 लोकांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्के नोंदवण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसींचे 219.90 कोटी डोस देण्यात आले आहेत.